Harbhajan Singh | ‘निर्णय झाला आहे…’, हार्दिकला दुर्लक्षित करणाऱ्या मुंबईतील सिनियर खेळाडूंना हरभजन सिंगने सुनावले

Harbhajan Singh | पाचवेळचा आयपीएल चॅम्पियन बनलेला मुंबई इंडियन्स संघ सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. लागोपाठ तीन पराभवांसह त्यांची सुरुवातच खराब झाली नाही, तर संघाची अंतर्गत स्थितीही चांगली दिसत नाही. संघातील वरिष्ठ खेळाडू नवा कर्णधार हार्दिक पांड्याला स्वीकारत नसल्याचा आरोप माजी क्रिकेटपटूंनी केला आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक डगआऊटमध्ये एकटाच बसलेला दिसला. त्याच्या आजूबाजूला संघसहकारी किंवा प्रशिक्षकही नव्हते. यावरुन संघाने हार्दिकला वेगळे पाडल्याचा आरोप होत आहे. अशातच मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने हार्दिकला पाठींबा दर्शवतना मुंबई संघातील वरिष्ठ खेळाडूंना सुनावले आहे.

हार्दिकला पाठिंबा न मिळाल्याने हरभजन सिंग संतापला. तो म्हणाला, “ही चित्रे चांगली दिसत नाहीत. हार्दिक एकटा पडला आहे. फ्रँचायझीच्या खेळाडूंनी त्याला कर्णधार म्हणून स्वीकारावे. निर्णय झाला आहे आणि संघाने एकसंध राहावे.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती