नाशिक पदवीधर बिनविरोध होणार नाही, ठाकरे गट मोठा डाव टाकण्याच्या तयारीत

satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज मिळूनही काँग्रेसच्या डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी अर्ज भरला नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने काँग्रेसमध्ये (Congress) चांगलीच खळबळ उडाली आहे. आपल्या मुलासाठीच सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सत्यजित तांबे यांना भाजपने (BJP) पाठिंबा देण्याची भाषा सुरू केल्याने काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीतही खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) ठणकावलं आहे.  त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत ठाकरे गट मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत तसंच त्यांनी विरोधक असतानाही मविआत समन्वय हवा असा सल्ला दिला आहे.