लालूंची तब्येत खालावली, रुग्णशय्येवरील फोटो शेअर करत मुलीची भावूक पोस्ट

पटना – राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाटणा येथील राबरी निवासस्थानी शिडीवरून खाली उतरत असताना तोल गेल्याने ते पडले. यात त्यांच्या खांद्याला आणि कमरेला दुखापत झाली असून ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) हिने त्यांचा रुग्णशय्येवरील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लालू प्रसाद यादव खुपच अशक्त झाल्याचे आणि त्यांची तब्येत खालावल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत रोहिणी आचार्य हिने वडील माझ्यासाठी हिरोसारखेच असून लवकर ते बरे व्हावेत अशीत मनोकामना केली आहे.