‘त्यांना जे म्हणायचंय ते त्यांनी म्हणावं, आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंय’

 पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहेत. या वादग्रस्त मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक होत आधी पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात उत्तर सभा आणि नंतर पुन्हा मुंबईत झालेल्या सभांमधून तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा (Ayodhya), त्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी केलेला विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी स्थगित केलेला दौरा या सगळ्याच मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली.

दरम्यान, या सभेत त्यांनी पाण्याचा प्रश्न, हिंदुत्व, अयोध्या दौरा, शेतकऱ्यांच्या समस्या यासह विविध मुद्यांवर भाष्य केले. दरम्यान, राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीवरील (MVA)  टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांना जे म्हणायचंय ते त्यांनी म्हणावं. आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंय असं ते म्हणाले.

मी काल देखील जळगाव जामवत, शहापूर, डहाणू, सिंदखेड राजा अशा ज्या ज्या ठिकाणी गेलो, तिथे माझी भूमिका तीच राहिली आहे. ज्याच्यातून महाराष्ट्रातल्या मुलांना रोजगार (Employment) निर्माण होणार आहे, ज्याच्यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे, ज्याच्यातून कायदा-सुव्यवस्थेचा (law and order) मुद्दा हाताळण्यात पोलिसांना मदत होणार आहे, त्या गोष्टीला देखील महत्त्व देऊ ना”, असं आवाहन अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना माध्यमांसमोर केलं.