जनतेच्या रेट्यापुढे सरकार झुकले; अखेर ठाकरे सरकारनेही केले इंधनाचे दर कमी  

मुंबई –  केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या (Petrol – Diesel) दरात कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकराने (Central Gov) पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी शनिवारी उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यांवरही दर कमी करण्याचा दबाव वाढला होता. मागील काही दिवसांत सातत्याने इंधन दरवाढ (Fuel price hike) होत असल्याने सर्वसामान्य नागरिक होरपळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारवरही दबाव वाढला होता.

रविवारी राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोलच्या मुल्यवर्धित करात (VAT) 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलवरील करात 1 रुपये 44 पैसे कपात कऱण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यावर अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून दर कमी कऱण्याची मागणी विरोधी पक्षांसह नागरिकांकडूनही होत होती.