प्रभू श्रीरामाचे अपहरण केलं आहे; संजय राऊत पुन्हा बरळले

Sanjay Raut: रामलल्लाच्या स्वागती जय्यत तयारी सुरू झाली आहे. राम मंदिराच्या (Ram Temple) सजावटीला सुरुवात झाली असून हजारो भक्तगण मंदिराला भेट देत आहेत. तसंच, मंदिर प्रशासनाकडूनही नियोजन आढावा घेतला जात आहे. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रमुख पाहुणे असतील. सोबतच देशभरातील अनेक मान्यवर, साधुसंत उपस्थित असतील.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला मात्र विरोधकांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. देशासाठी ज्यांचं काहीच योगदान नाही त्यांनी संसदेचं उद्घाटन केलं. अयोध्येसाठी त्यांचं काहीच योगदान नाही ते राम मंदिर उत्सव करत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे.

संपूर्ण देशात नेत्यांना प्रश्न विचारला जातोय तुम्हाला निमंत्रण आलं का? हा भाजपचा कार्यक्रम आहे. राम मंदिर उत्सव नाही, यूपीमध्ये आणि दिल्लीत भाजप सरकार आहे. मला वाटतं प्रभू श्रीरामाचे अपहरण केलं आहे. भाजपचा कार्यक्रम झाला की आम्ही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाऊ. आम्हाला आमंत्रणाची गरज नाही आम्ही स्वतःच दर्शनाला जाणार आहे. हा भाजपचा कार्यक्रम आहे त्यांना तो करू द्या, असे देखील संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत