अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक! आई स्नेहलता यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन

Mumbai- अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit Nene) हिला मातृशोक झाला आहे. माधुरीची आई स्नेहलता दीक्षित (Madhuri Dixit Mother) यांचे आज सकाळी ८.४० वाजता निधन झाले. त्यांचे वय सुमारे ९१ वर्षे होते. स्नेहलता दीक्षित यांच्या निधनाची माहिती माधुरी दिक्षितचे कौटुंबिक सहकारी रिक्कू राकेश नाथ यांनी दिली. स्नेहलता दीक्षित यांचा घरीच नैसर्गिक मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी माधुरी दीक्षितनेही ही दु:खद बातमी शेअर केली आहे.

त्यांनी लिहिले, ‘आमच्या प्रिय आई स्नेहलता दीक्षित आज सकाळी प्रियजनांना सोडून निघून गेल्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामाता नगर, वरळी मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.’