LokSabha Election 2024 | प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते उतरणार मैदानात; सोलापूरची लढाई बनली रंगतदार

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या ( LokSabha Election 2024) तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत 111 उमेदवारांची नावे आहेत. भंडारा गोंदियातून सुनील बाबूराव मेंढे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील. तर गडचिरोलीतून अशोक महादेव नेते भाजपाचे उमेदवार आहेत. सोलापूरमध्ये म्हणजेच प्रणिती शिंदेंच्या समोर भाजपाच्या राम सातपुतेंचं आव्हान असणार आहे.

सोलापुरातून भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके उडवत जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे आमदार राम सातपुते यांचा लढा आता लोकसभेच्या (LokSabha Election 2024) रिंगणात रंगणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार