ठाकरे सरकार हे टक्केवारी आणि वसुलीत खूश; ते पाणी प्रश्नावर गंभीर नाहीत – फडणवीस

जालना – औरंगाबादमधील मोर्चानंतर आज भाजपने (BJP) जालन्यात देखील पाणी प्रश्नावरून मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या (Leader of Opposition Devendra Fadnavis and Union Minister Raosaheb Danve) नेतृत्वात जालन्यात भाजपचा जलआक्रोश मोर्चा (BJP’s Jalakrosh Morcha) काढण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला पाणी प्रश्नावरून चांगलेच घेरले. शहरातील मामा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे (MLA Santosh Danve), आमदार नारायण कुचे (MLA Narayan Kuche) आदींची मोर्चाला उपस्थिती होती.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ठाकरे सरकार (Thackeray government) हे टक्केवारी आणि वसुलीत खूश आहे. जनतेच्या प्रश्नाचे सरकारला देणे घेणे नाही. मराठवाड्याची कवचकुंडले सरकारने या मारून टाकली. जनतेच्या समस्या सोडवणार नसाल, तर तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल फडणवीस यांनी बुधवारी केला.

फडणीस म्हणाले की, मुख्यमंत्री कार चालवतात. सरकार भगवान चालवते. राज्यातले सरकार राम भरोसे आहे. या सरकारला जागे करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. हे सरकार पाणीप्रश्नासाठी सरकार गंभीर नाही. या सरकारने पाणी योजनांची हत्या केली, असा आरोपही त्यांनी केला.

धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती जालन्यात आहे. पैठणच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असताना जालन्यात 15-15 दिवस पाणी येत नाही. सरकारला जागं करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.