संतापजनक! शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल, शिवसैनिक आक्रमक

मुंबई- राजकीय क्षेत्रातून एक अत्यंत संतापजनक घटन पुढे आली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या व्हायरल अश्लील व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे.

पण विनयभंगासारखा गुन्हा दाखल करून असे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अद्दल घडवावी अशी मागणी शिवसैनिकांनी करत पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. यासंदर्भात पोलीस कार्यवाही करत आहेत. शीतल म्हात्रे यांनी ‘मातोश्री’ नावाच्या पेजवर हा व्हिडिओ मॉर्फ करून घाणेरडा मजकूर लिहून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत एकाला अटक केली. इतरांचाही पोलीस शोध घेत आहेत.

राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?, अशा शब्दांत शीतल म्हात्रे यांनी व्हिडिओ व्हायरल करण्यांवर टीका केली आहे.