महायुतीचे विभागीय स्तरावर देखील मेळावे होणार – आमदार प्रसाद लाड

Prasad Lad: १४ जानेवारी २०२४ रोजी महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हास्तरीय मेळावे संपन्न झाले. एकूण ३६ ठिकाणी हे मेळावे पार पडले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यासह महायुतीतील एकूण १५ पेक्षा अधिक घटक पक्षातील स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय जिल्हा पातळीवर हे मेळावे पार पडले.

यावेळी महायुतीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, आर. पी. आय. (आठवले गट), जोगेंद्र कवाडे यांची पी. आर. पी., हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, विनय कोरे यांची जे. एस. एस. पार्टी, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, बच्चू कडू यांचा पी. जे. पी. पक्ष, रवि राणा यांची युवा स्वाभिमानी पार्टी, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, शिवसंग्राम, आर. पी. आय. (खरात गट) आणि भीमसेना अशा एकूण १५ घटक पक्षांचे स्थानिक पदाधिकारी त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपस्थित होते.

कालच्या महायुतीच्या मेळाव्यानंतर महाविकास आघाडीची हवा निघून गेली असून, महाराष्ट्रात महायुती किती अभेद्य आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ‘महाविजय २०२४’ साध्य होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अंत्योदयाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातून ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणणे, ही आमच्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मत, यानिमित्ताने महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यात महायुतीचे हे मेळावे एकाच दिवशी पार पडले. महायुतीच्या घटक पक्षातील स्थानिक पातळीवरील नेते याप्रसंगी प्रत्येक ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी सहभाग घेऊन मेळावा यशस्वी केला.
महायुतीच्या ४५ पेक्षा जास्त जागा नक्की निवडून येतील, असा विश्वास आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी व्यक्त केला. राहुल गांधी भारत जोडो करायला निघाले पण इकडे महाराष्ट्रात येत्या काळात कॉंग्रेस छोडो होणार आहे, राहुल गांधी जेवढे चालतील तेवढी कॉंग्रेस संपत जाईल, असेही आमदार लाड यावेळी म्हणाले.

येत्या काळात महायुतीचे ६ विभागीय स्तरावर महामेळावे होतील. नागपूर, अमरावती, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश अशा ६ विभागात मेळावे होतील. या मेळाव्यांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेला जो उमेदवार दिला जाईल, तो महायुतीचा उमेदवार असेल!, आम्ही महायुतीचा उमेदवार म्हणून येणारी निवडणूक लढू आणि त्याला जिंकून आणू, असेही आमदार लाड यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच 73 हजारांच्या पार, निफ्टी 22 हजारांच्या वर

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका