ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध, पुरोहित वर्गाने अटल पेन्शनचा लाभ घ्यावा!

Chandrakanat Patil:– ब्राह्मण समाजाच्या (Brahman Community) सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द असून, समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. त्याचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा, अटल पेन्शन सारख्या योजनेचा पुरोहित वर्गाने अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन नामदार चंद्रकांतदादां पाटील यांनी केले. कोथरुड मधील सेवा भवन येथे मकर संक्रांतीनिमित्त (Makar Sankranti) पुरोहित सस्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाटील बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, दक्षिण कोथरुड मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, ॲड मिताली सावळेकर, परशुराम संघाचे विश्वजीत देशपांडे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कुलदीप सातवळेकर, यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार सदैव कटिबद्ध आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना सक्षम करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्याचा कोट्यवधी भारतीयांना लाभ होत आहे. माननीय मोदीजींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कोथरुड मध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचा पुरोहित वर्गाने ही लाभ घ्यावा.

ते पुढे म्हणाले की, माननीय मोदीजींनी अटल पेन्शन आणि आयुषमान भारत सारख्या योजनेमधून सर्वसामान्यांचे जीवन अतिशय सुरक्षित केले आहे. अटल पेन्शन योजनेमुळे ६० वर्षांनंतर दरमहा पेन्शन सुरू होते. तर आयुषमान भारत योजनेमुळे पाच लाखांपर्यंतचे औषधोपचार मोफत होत आहेत. त्यासोबतच ‘हर घर नल से जल’ योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबवली आहे. तसेच, सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींची शिक्षणाची व्यवस्था केली आहे. कोथरुड मधील अनेक नागरीक याचा लाभ घेत आहेत.

अटल पेन्शन योजनेबाबत बोलताना पाटील पुढे म्हणाले की, माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शीपणातून अटल पेन्शन योजनेद्वारे असंघटित क्षेत्रातील नागरिकांना पेन्शन सुरू झाली आहे. पुरोहित वर्गाने त्याचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. मतदारसंघातील पुरोहित बांधव यासाठी जितके योगदान देतील, त्यात आम्ही देखील सहकार्य करु, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. मिताली सावळेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन कुलदीप सावळेकर यांनी केले.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच 73 हजारांच्या पार, निफ्टी 22 हजारांच्या वर

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका