राम मंदिर उदघाटन सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अयोध्येला जाणार

Ramdas Athawale –  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राम मंदिर  उदघाटन सोहळ्याचे  निमंत्रण प्राप्त झाले असून  येत्या दि.22  जानेवारीस रामदास आठवले राम मंदिर उदघाटन सोहळ्यास अयोध्येला जाणार आहेत असे आज अधिकृत रामदास आठवले यांनी जाहीर केले.

भारतीय दलित पँथरच्या काळापासून मी महाराष्ट्रात  फिरत असताना अनेक गावांत मला हिंदू मंदिरात मला भेट देण्याचा आग्रह केला जात असे. अनेक गावांतील मंदिरात गावकरी माझे स्वागत करीत असत. अनेक गावांत बुद्ध विहार उदघाटन आणि भीम जयंती बुद्ध जयंती ला हिंदू धर्मीय पुढारी येत असतात. महाराष्ट्रात असे बंधुत्वाचे चित्र दिसते. एकमेकांच्या धार्मिक उत्सवात प्रार्थनास्थळी भेट देणे; एकमेकांच्या धार्मिक उपसना श्रद्धास्थानांचा आदर करून सर्वधर्मसमभाव जपला पाहिजे. बंधुभाव वाढला पाहिजे. हा बंधुत्वाचा विचार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  देशाला दिलेल्या संविधानात अभिप्रेत आहे. त्यामुळे आपण राम मंदिर उदघाटन निमंत्रण स्वीकारले असून  दि.22 जानेवारीला अयोध्येला आपण जाणार आहोत असे रामदास आठवले यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच 73 हजारांच्या पार, निफ्टी 22 हजारांच्या वर

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका