आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता भाजपने करावी – महेश तपासे

मुंबई – विकास निधी मिळत नसल्याची तक्रार वर्ध्याचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे करुन नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता भाजपने करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदारांना विकास निधी मिळत नसल्याची तक्रार भाजप व शिंदे गटाचे नेते नेहमी ओरडून – ओरडून करत होते. शिवाय या निधी वाटपावरून आघाडी तुटणार असे वक्तव्य करत होते मात्र आज भाजप आमदारच विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करत आहेत याकडे महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे मुंबईत आले असतानाच भाजप आमदार दादाराव केचे यांनी ही तक्रार केली आहे त्यामुळे या तक्रारीला अधिक महत्त्व आले आहे असेही महेश तपासे म्हणाले.