“लव्ह यू बेबी, मी नेहमीच तुझ्या पाठीशी” वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंड अर्जुनच्या मलायकाला प्रेमळ शुभेच्छा

Malaika Arora Birthday: अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malika Arora) एकमेकांना ३ वर्षांपासून डेट करत आहेत. हे दोघेअनेकदा एकत्र पाहायला मिळतात. आज मलायकाला वयाची ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास दिनी अर्जुनने तिला प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्जूननं मलायकाला शुभेच्छा देणारी पोस्ट इंस्टावरुन व्हायरल केली आहे. त्यात त्यानं लव यु म्हणत, मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. असे म्हणणारी पोस्ट शेयर केली आहे. त्यावर मलायकानं देखील लव यु बेबी असे म्हणत अर्जून सोबत आपलं सगळं आलबेल असल्याचे संकेत दिले आहे.