कमाल, लाजवाब! कोहलीच्या ‘विराट’ खेळीमुळे भारताने २० वर्षांनंतर न्यूझीलंडला विश्वचषकात केले पराभूत

IND vs NZ World Cup: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात धरमशाला येथे विश्वचषकातील २१ वा सामना झाला. भारताची रनमशीन विराट कोहली याच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारताने २० वर्षांनंतर विश्वचषकात न्यूझीलंडला पराभूत केले आहे. भारताने १२ चेंडू शिल्लक असताना ४ विकेट्सने सामना खिशात घातला.

न्यूझीलंडच्या २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून विराटने (Virat Kohli) सर्वाधिक ९५ धावा केल्या. २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने ही झुंजार खेळी केली. जरी ५ धावांनी त्याचे शतक हुकले असले तरीही त्याच्या योगदानामुळे भारत हा सामना जिंकू शकला. विराटव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्माने ४६ धावांची आक्रमक खेळी केली. तसेच रविंद्र जडेजानेही ३९ धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी न्यूझीलंडकडून मिशेलने १२७ चेंडूत १३० धावांची शानदार शतकी खेळी केली. या खेळीसाठी त्याने ५ षटकार आणि ९ चौकार मारले. त्याच्या साथीला रविंद्रने १ षटकार व ६ चौकारांच्या मदतीने ७५ धावा जोडल्या. इतर फलंदाजांना मात्र दुहेरी धावा करणेही कठीण गेले.

या डावात भारताकडून शमीने (Mohammed Shami) चमकदार कामगिरी केली. त्याने १० षटके फेकताना ५४ धावा देत न्यूझीलंडच्या ५ फलंदाजांना बाद केले. यात मिशेल आणि रविंद्रच्या विकेटचाही समावेश आहे. तर कुलदीप यादवने २ आणि जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराजने प्रत्येकी १ विकेट काढली.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर