राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली, आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

पुणे – महत्त्वाच्या कामासाठी पुण्याचा (Pune ) दौरा अर्धवट ठेवून मुंबईला (Mumbai) परतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (President of Maharashtra Navnirman Sena Raj Thackeray) यांची सभा रविवारी (२२ मे) गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) येथे होणार आहे.

दरम्यान, याआधी याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी, राज ठाकरेंची सभा पुढील आठवडभरात होणार असल्याचं स्पष्ट केले होते. राज ठाकरे उद्या सकाळी अकराच्या सुमारास सभेचं ठिकाण आणि वेळ जाहीर करणार आहेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते.

यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यासाठी आणि अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाण्यापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे पुण्यामध्ये आले होते. मात्र, अचानक ठाकरे यांना पुण्याचा दौरा अर्धवट ठेवून मुंबईला परतावे लागले होते. त्यानंतर ही सभा होईल की नाही या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र,आता ही सभा रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.