मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी वाद मिटवावा नाहीतर…; Ramdas Athawale स्पष्टच बोलले

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मी खरा शिष्य-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Ramdas Athawale- एक काळ असा होता की अनेक जाती स्वतःला मागास मानण्यास आणि आरक्षण मागण्यास तयार होत नसत. मात्र आता आरक्षणाचे महत्व सर्वाना पटत आहे.मराठा समाजाने आता आहे त्या ओबीसिंच्या आरक्षणातून आरक्षण मागू नये तर ओबीसी मध्ये स्वतंत्र प्रवर्ग करून ओबीसी म्हणूनच आरक्षण घ्यावे.मराठा समाजातील ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे अशा गरीब मराठा समाजाला आरक्षण पाहिजे हीच मनोज जरांगे यांची मागणी आहे आणि त्या मराठा आरक्षण मागणीला आमचा पाठिंबा आहे.मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांनी वाद मिटविला पाहिजे.महाराष्ट्रात सर्व समाजात सहिष्णुता आहे. वाद होणे योग्य नाही.जरांगे आणि भुजबळ यांनी राज्याच्या हितासाठी वाद मिटवावा नाहीतर मला येऊन त्यांचा वाद मिटवावा लागेल असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले(Ramdas Athavale) यांनी केले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाणदिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित जाहीर अभिवादन सभेत ना रामदास आठवले बोलत होते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नेहरू मंत्रिमंडळात कायदा मंत्री होते त्याकाळात त्यांनी मी जरी काँग्रेस सोबत युती केली असली तरी मी कणखर आहे काँग्रेस च्या नदीत ढेकळा सारखे विरघळणार नाही असे म्हंटले होते त्यामुळे मी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा शिष्य आहे.मोदींसोबत असलो तरी माझ्या हाती निळा झेंडा आहे.मी कणखर असून ढेकळासारखा विरघळणार नाही . लोकसभेत आर पी आय चा एकही खासदार नाही तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मला केंद्रीय मंत्री मंडळात घेतले आहे .मी संसदेत जयभीम चा नारा बुलंद केला आहे असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. शेतकाऱ्यांचे कर्ज माफ केले तसे मागसावर्गीयांचे कर्ज शासनाने माफ करावे अशी मागणी यावेळी ना रामदास आठवले यांनी केली.

येत्या दि 16 डिसेंम्बर रोजी आयोजित जागतिक धम्मपरीषदेत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले . यावेळी सौ.सीमाताई आठवले; जित आठवले यावेळी माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर; भदंत राहुल बोधी महाथेरो; गौतम सोनवणे; रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; विवेक पवार; सुरेश बारशिंग; दयाळ बहादूर; श्रीकांत भालेराव; साहेबराव सुरवाडे; संजय डोळसे; रमेश गायकवाड;अजित रणदिवे ; अनिलभाई गांगुर्डे; शिलाताई गांगुर्डे; सचिनभाई मोहिते आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

हे ट्रिपल इंजिन सरकार नसून ट्रबल इंजिन सरकार; जयंत पाटील विधानसभेत गरजले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा;अशोक चव्हाण यांची मागणी

धीरज साहू यांच्याकडे इतका अमाप काळा पैसा असेल तर दुकानाच्या मालकाकडे किती काळा पैसा असेल ?