प्रताप सरनाईक यांना ईडीचा दणका; तब्बल ११.३५ कोटींची संपत्ती जप्त

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( cm uddhav thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (shridhar patankar)यांची संपत्ती जप्त केल्यानंतर ईडीने शिवसेनेला आणखी दुसरा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेना नेते प्रताप सरनाईक सक्तवसुली संचालनलायाने चांगलाच दणका दिला आहे.

ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत. या कारवाईत प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांची 11.36 कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. सरनाईक आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या दोन आठवड्यात ईडीने केलेली ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

ईडीने यापूर्वीही एनएसीएल प्रकरणात सरनाईक यांची चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. आज अचानक ईडीने सरनाईक यांची संपत्ती जप्त केल्याने या कारवाईने ठाण्यातही खळबळ उडाली आहे.