‘भारतातला सर्वात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ’, Manoj Jarange यांचा घणाघात

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal: मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी मंत्री छगन भुजबळ यांचा एकमेकांवर हल्लाबोल सुरू आहे. मात्र यादरम्यान मनोज जरांगे यांनी भुजबळांचा समाचार घेताना त्यांच्यावर पातळी ओलांडून टीका केली आहे. भुजबळ हे भारतातील सर्वात कलंक लागलेले मंत्री आहेत, असे मनोज टीकास्त्र मनोज जरांगेनी सोडले आहे.

जालन्यातील जाहीर सभेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “सगळ्यांच्या टॉर्च चालू करा. एकही टॉर्च बंद ठेवू नका. आता ते काही झोपत नाही गड्या. हिंगोलीत येऊन गप्पा हाणतो. इकडे येतो आणि जातीवाद करतो. घटनेच्या पदावर बसतो, सरकारसोबत राहतो, आणि महापुरुषांच्या जाती काढणारा, भारतातला सर्वात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ. जाती-जातीत तेढ निर्माण करणारा, ओबीसी बांधव आणि मराठा बांधव गुण्यागोविंदाने जगत असताना त्यांच्यामध्ये दंगली घडवण्याचं काम करणारा, सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.

“स्वत:चं वय झालेलं असताना, कायद्याच्या पदावर बसलेला असताना, कायदा पायदडी तुडवणारा, इतक्या खालच्या दर्जाचा माणूस आतापर्यंत कधी झाला नाही. या भारत देशात आणि महाराष्ट्रात महापुरुषांच्या जाती काढणारा आतापर्यंत एकही व्यक्ती झाला नाही. यांनी महापुरुषांच्या जाती काढल्या, राजद्रोह सारखा प्रकार हा माणूस करायला लागला आहे. जाती-जातीत दंगली भडकवण्याचा प्रकार करायला लागला आहे”, असा आरोप मनोज जरांगेंनी केला.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी