दादांच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करायला राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज – सुनिल तटकरे

Sunil Tatkare – लोकसभेत एनडीएला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यानंतर आपल्याला सर्वोच्च स्थानावर दादांना पहायचे असून दादांच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करायला राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाला आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कर्जतच्या वैचारिक मंथन शिबीरात केले.

उद्याच्या भवितव्याची अपेक्षा आम्ही ठेवत असू तर तुम्हीही त्याला सहकार्य केले पाहिजे. युवक, युवती आणि महिलांना राजकारणात सक्रिय करायचे आहे. ज्या महिलांसाठी सावित्रीबाई फुले यांनी लढा दिला त्या महिलांसाठी भविष्यात जास्त जागांवर संधी मिळू शकते असेही सुनिल तटकरे म्हणाले.

सत्ता नसताना काय होते हे अनुभवले आणि गेल्या पाच महिन्यात सत्ता आल्यावर काय बदल होत आहे आपण बघत आहोत आता पुढचा काळ कसोटीचा आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने आपल्याला वाटचाल करायची आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. पुढचे पक्षाचे अधिवेशन म्हणाल त्या ठिकाणी घेऊ मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे लक्ष द्या. आजच्या शिबीरातून ऊर्जा घेऊन कामाला लागुया असेही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी