“असे लोक रस्त्यावर लोकांसमोर XXX करतील” म्हणणाऱ्याला अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा!

"असे लोक रस्त्यावर लोकांसमोर XXX करतील" म्हणणाऱ्याला अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा!

सिनेमांबरोबर हिंदी आणि मराठी मालिकांचीही वेगळीच क्रेझ आहे. दररोज संध्याकाळी गृहिणींचा मराठी मालिका पाहण्याचा कार्यक्रम ठरलेलाच असतो. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीतील एक मालिका म्हणजे मन झालं बाजिंद (Man Jhal Bajind). या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री श्वेता खरात (Shweta Kharat) ही सोशल मीडियावर सक्रिय असते.  श्वेताने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कमेंटवर तिने प्रतिक्रिया दिली आहे.

श्वेतानं अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर साडी नेसलेला एक फोटो शेअर केला होता. निळ्या रंगाची साडी नेसलेली श्वेता या फोटोमध्ये खूपच सुंदर आहे. अनेकांनी कॉमेन्टमधून श्वेताचं कौतुक केलं आहे. मात्र काहींना श्वेताचा हा लुक अजिबातच आवडला नाही. त्यांनी कमेन्टमधून अभिनेत्रीवर टीका केली.

श्वेताच्या या पोस्टवर एकाने अश्लील कमेंट केली आहे. “काही दिवसांनी असे लोक तर रस्त्यावर सेक्स करतील लोकांसमोर”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना श्वेता म्हणाली, “तुमच्यासारखे म्हणायचं का तुम्हाला? कारण तुमच्या सारख्या विचारसरणीची लोक १०० टक्के करतील No doubt! मला तुमच्या घरातील स्त्रियांबद्दल खूप वाईट वाटतंय आणि तुम्हाला लहान मुलगी सुद्धा आहे. सर जरा तिच्यासाठी तरी सुधारा. तिला मोठं झाल्यावर वडील म्हणायची लाज वाटू नये याची काळजी घ्या”, असे तिने यात म्हटले आहे.

 

श्वेताला ट्रोल करणाऱ्यांवर तिचा सहकलाकार असलेल्या वैभव चव्हाणने देखील टीका केली. “अगं केसात काकूंसारखं एक फूल लावलं असत तर त्यांना नक्कीच आवडला असता फोटो.. सुंदर दिसते आहेस तू…काकू जरा जळत आहेत बाकी काही नाही.” असे वैभव चव्हाणने म्हटले आहे.

Previous Post
फक्त तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या; जयंत पाटलांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र

फक्त तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या; जयंत पाटलांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र

Next Post
साप चावला तर घाबरू नका, १० मिनिटांच्या आत करा 'ही' कामे!

साप चावला तर घाबरू नका, १० मिनिटांच्या आत करा ‘ही’ कामे!

Related Posts
Real Life | प्रत्येक मुद्द्यावरुन दीराशी होतात वाद? नात्यात गोडवा आणण्यासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील

प्रत्येक मुद्द्यावरुन दीराशी होतात वाद? नात्यात गोडवा आणण्यासाठी या टिप्स उपयुक्त ठरतील

चित्रपट असो किंवा वास्तविक जीवन (Real Life ), दीर-वहिणीचे नाते अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये कधी भाऊ-बहिणीचे…
Read More
तमन्ना भाटियासोबत ब्रेकअपनंतर फातिमाला डेट करतोय विजय; अभिनेत्री म्हणाली, "शारिरीक आकर्षण..."

तमन्ना भाटियासोबत ब्रेकअपनंतर फातिमाला डेट करतोय विजय; अभिनेत्री म्हणाली, “शारिरीक आकर्षण…”

तमन्ना भाटियानंतर, विजय वर्माचे नाव सध्या फातिमा सना शेखशी ( Fatima Sana Shaikh) जोडले जात आहे. याबद्दल कोणतीही…
Read More

आसाराम बापूंकडे आहे १०००० कोटींची संपत्ती, आता कोण सांभाळतंय त्यांचं आश्रम साम्राज्य?

नवी दिल्ली- 400 हून अधिक आश्रम, 1500 हून अधिक सेवा समित्या, 17000 हून अधिक बालसंस्कार केंद्रे, 40 पेक्षा…
Read More