नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्याकडून दुसरी अपेक्षा करु शकत नाही..; विरोधकांची अजित पवारांवर टीका

Ajit Pawar Statement On PHD Student: विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. विविध मुद्द्यांवर सभागृहात चर्चा होत आहे. विविध विधेयकं, प्रस्ताव मांडले जात आहेत. अशातच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक विधान केले आहे.

हिवाळी अधिवेशन सुरू असताना सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ 200 विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. यावरून अजित पवार, पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असे विधान करत टीकेचे धनी ठरले आहेत.

अजित पवारांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे म्हणाले, नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्याकडून दुसरी अपेक्षा करु शकत नाही. हे असंवेदनशील सरकार आहे.  शिक्षणाबद्दल अनास्था दिसून येते, पीएचडी करून केवळ नोकरी मिळत नसते तर संशोधन करण्यात येते. देशात केवळ 0.5 टक्के विद्यार्थी पीएचडी होतात. सारथीसाठी दिलेल्या जाहिरातीत पात्र विद्यार्थ्यांची सी ई टी परीक्षा घेण्यात येईल असं कुठेही उल्लेख नव्हता. त्याविरोधात 45 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. 1329 पात्र विद्यार्थी झाले  जाहिराती नुसार पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप प्रदान करावी.

महत्वाच्या बातम्या-