Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार

Mahadev Jankar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे शरद पवार Sharad Pawar) यांच्याशी हातमिळवणी करत माढ्यातून लोकसभा लढवतील अशा चर्चा होत्या. मात्र आता या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. महादेव जानकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार यांची भेट घेत आपण महायुतीतच राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी महादेव जानकर यांना लोकसभेसाठी एक जागा देण्यात येईल, असा निर्णयही घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र यांच्या नेतृत्त्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्त्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. त्यामुळे आपण मोदींसोबत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार