मावळातील वडगावच्या तरुणाची कमाल; ‘सीडीएस’ परीक्षेत मिळवले उत्तुंग यश

पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (CDS) परीक्षेत वडगाव मावळ येथील अदित्य विवेक गायकवाड (Aditya Vivek Gaikwad) याचा देशात २० वा नंबर आला आहे. अदित्य लवकरच डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (Indian Military Academy) येथे प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे.

यावर्षी देशभरातून जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यापैकी साडेचार हजार विद्यार्थी लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले. यापैकी केवळ १४२ विद्यार्थांची निवड झाली आहे. अदित्येने औरंगाबादच्या देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज (Devgiri Institute Of Engineering & Management Studies) येथे ‘बी टेक’ पदवी घेतली आहे.

वडगाव मावळ येथे लहानाचे मोठे झालेले अदित्यचे वडील कर्नल विवेक गायकवाड (Karnel Vivek Gaikwad) हे सध्या आसाम येथे कर्तव्यावर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अदित्य याने हे यश कुठल्याही शिकवणी विना मिळवले आहे.इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आदित्य भारतीय नौदल अकादमीमध्ये कार्यकारी शाखेत रूजू होणार आहे.