मेरठचं नाव नथूराम गोडसे नगर करणार, हिंदू महासभेच्या घोषणेमुळे नवा वाद 

 मेरठ – हिंदू महासभेने मेरठमध्ये महापालिका निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. उमेदवारांची पात्रता आणि त्यांचा जाहीरनामाही जाहीर झाला आहे. महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पंडित अशोक शर्मा आणि प्रेस प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करताना सांगितले की, महासभा नगराध्यक्ष, नगरसेवक, संस्था आणि नगरपालिका अशा प्रत्येक स्तरावर आपले उमेदवार उभे करेल. दरम्यान, यावेळी निवडणूक जिंकल्यानंतर महासभेने मेरठचे नाव नथुराम गोडसे नगर असे करण्याचे आश्वासनही दिले आहे.

मेरठमधील महासभेत उमेदवार विजयी झाल्यास जिल्ह्याचे नाव बदलून ‘नथुराम गोडसे नगर’ करण्यात येईल, असे हिंदू महासभेच्या वतीने सांगण्यात आले. याशिवाय शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणची इस्लामिक नावे बदलून हिंदू महापुरुषांची नावे ठेवण्यात येणार आहेत. यावरून वाद निर्माण झाला आहे.

पीस पार्टीचे प्रवक्ते शादाब चौहान यांनी नथुराम गोडसेला दहशतवादी ठरवताना म्हटले आहे की, स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी नथुराम गोडसे यांच्या नावाने मेरठ या क्रांतिकारक भूमीचे नाव ठेवण्याची भाषा करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी यूएपीए  अंतर्गत कारवाई केली पाहिजे.