“दडपशाहीने आमदार रोहित पवार यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय”, राष्ट्रवादीचा आरोप

Rohit Pawar : राष्ट्रीय नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुरोगामी विचार घेऊन महाराष्ट्रभर फिरणारे पक्षाचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारने केला आहे.

कायद्याची पायमल्ली करून तसंच केंद्रीय यंत्रणेचा धाक दाखवून महाराष्ट्राच्या जनतेच्या मानगुटीवर बसलेल्या विद्यमान असंविधानिक सरकारचा जाहीर निषेध राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केला.

महाराष्ट्रात आमदार रोहित पवारांची लोकप्रियता अनेक लोकांना बघवत नाही व त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा आड घेऊन राजकीय डाव साधण्यासाठी रोहित पवारांच्या कंपनीवर कार्यवाही मुख्यमंत्री शिंदे यांच्या सरकारने केल्याचा गंभीर आरोप तपासे यांनी केला आहे.

महाराष्ट्र याला घाबरत नाही तुम्ही कितीही पुरोगामी विचारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी देखील आमचं मनोबल खच्चीकरण होत नाही आणि आता रोहित पवारांसोबत महाराष्ट्रातले लाखो तरुण या सरकारचं विसर्जन करण्यासाठी कामाला लागलेले आहेत.

संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या सोबत जाण्याला विरोध दर्शवल्यामुळे सरकारमध्ये सामील झालेल्या अनेक आमदारांची गोची झाली आहे त्यांच्या मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते जैसे थे या परिस्थितीत आदरणीय पवार साहेबांसोबत राहिले. सरकारसोबत गेलेले अनेक आमदार पराभवाच्या छायेत असल्याचा दावाही महेश तपास यांनी केला

मा.अजित दादा पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर देखील राष्ट्रवादीचा जनाधार महाराष्ट्रात कमी झाला नाही याचा दुःख भाजपला आहे आणि म्हणूनच ही कारवाई केली असल्याचा आरोप तपासे यांनी केला.

सूडबुद्धीने केलेल्या या कारवाईचे उत्तर बारामतीची जनता आणि महाराष्ट्रातले मतदार योग्य वेळी देणार अशी घोषणा महेश तपासे यांनी केली.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा