Baba Vanga Predictions 2024 | बाबा वेंगाच्या भविष्यवाणी खऱ्या ठरत आहेत? 2024 मध्ये काय होऊ शकते ते जाणून घ्या

Baba Vanga Predictions 2024: बाबा वेंगा हे जगातील प्रसिद्ध भविष्यवक्त्यांपैकी(Baba Vanga Predictions 2024)  एक होत्या, ज्या बल्गेरियामध्ये राहत होत्या. त्यांचा जन्म 1911 साली झाला. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी बाबा वेंगाच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. बाबा वेंगा यांचे ऑगस्ट 1996 मध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी सन 5079 पर्यंतची भविष्यवाणी करुन ठेवली होती. आतापर्यंत बाबा वेंगाची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. बाबांनी अमेरिकेत 9/11 चा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि ब्रेक्झिट यांसारख्या अनेक भविष्यवाण्या (Baba Vanga Predictions 2024) आधीच केल्या होत्या.

बाबा वेंगा यांनी 2024 या वर्षासाठी अनेक भाकितेही केली आहेत. यातील एकही भाकीत खरा ठरला तर संपूर्ण जगात खळबळ उडेल. बाबा वेंगा यांच्या मते, 2024 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Putin) यांची हत्या होऊ शकते. या कटात इतर कोणी नसून त्यांच्याच देशातील लोकांचा सहभाग असू शकतो.

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार 2024 मध्ये कर्करोगासह अनेक असाध्य आजारांवर उपचार मिळू शकतात. आता अनेक शास्त्रज्ञ लवकरच कॅन्सरची लस (Cancer vaccine) शोधण्याचा दावा करत आहेत.

बाबा वेंगाचे पुढील भाकीत आर्थिक संकटाशी संबंधित आहे. बाबांच्या मते, 2024 मध्ये संपूर्ण जग मोठ्या आर्थिक संकटातून जाऊ शकते. बाबा वेंगा यांच्या मते, देशातील सर्वात मोठा देश 2024 मध्ये जैविक शस्त्रांची चाचणी घेऊ शकतो. बाबा वेंगाचे हे भाकीत खरोखरच खतरनाक सिद्ध होऊ शकते.

बाबा वेंगा यांनी यावर्षी ग्लोबल वॉर्मिंगबाबत इशारा दिला आहे. त्यांच्या मते, 2024 मध्ये संपूर्ण जगाला हवामानाशी संबंधित गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार