मर्सिडीज-बेंझने लाँच केली शक्तिशाली 7 सीटर SUV, किंमत जाणून तुम्ही आवक व्हाल 

Mumabai – लक्झरी कार कंपनी मर्सिडीज-बेंझ इंडियाने शुक्रवारी देशात दोन सात-सीटर स्पोर्ट्स युटिलिटी वाहने (SUV) – GLB आणि EQB लाँच केली. या वाहनांची शोरूम किंमत ६३.८ लाख ते ७४.५ लाख रुपये आहे. GBL सिरीजच्या तीन ट्रिम्सच्या किंमती अनुक्रमे रु. 63.8 लाख, रु. 66.8 लाख आणि रु. 69.8 लाख आहेत. पूर्णपणे इलेक्ट्रिक EQB 300 4MATIC ची किंमत 74.5 लाख रुपये आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्टिन श्वेंक यांनी निवेदनात म्हटले आहे की, “या दोन्ही एसयूव्ही मोठ्या कुटुंबांसाठी अधिक चांगल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, कंपनी पहिल्यांदाच आपल्या ग्राहकांना पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक असे तीन प्रकार एकाच वेळी देत आहे. पुणे स्थित कंपनीने सांगितले की त्यांच्याकडे देशभरात 30 जलद चार्जिंग चार्जर स्थापित आहेत आणि या महिन्याच्या अखेरीस ही संख्या आणखी 10 पर्यंत वाढेल.