हर हर महादेव सिनेमा टीव्हीवर दाखवू नका, अन्यथा गंभीर परिणामांना तयार राहा , संभाजीराजेंचा झी स्टुडिओला इशारा

मुंबई : ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) सिनेमावरून वाद सुरु असतानाच हा सिनेमा झी मराठीवर दाखवण्यात येणार आहे. या पाश्वभूमीवर संभाजीराजेंनी (Yuvraj Sambhajiraje Chhatrapati) झी स्टुडिओला इशारा दिली आहे. “हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ (Zee Studios) जबाबदार असेल”, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे संभाजीराजे यांनी ?

हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल.हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे.इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत #स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल…