स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम

पुणे : औंध, बालेवाडी, बाणेर, सुस, महाळुंगे परीसरातील विद्यार्थी वर्ग आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरूणांसाठी भाजपचे नेते लहु बालवडकर यांनी खास उपक्रम हाती घेतला आहे. लहु बालवडकर सोशल वेल्फेअर आणि राष्ट्रबांधव अकँडमी यांच्या संयुक्त विद्यामाने यशस्वी- स्पर्धा परीक्षा संकल्प राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनासाठी मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ त्यासोबतच पुणे शहराचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्याहस्ते लहू बालवडकर सोशल वेल्फेअर व राष्ट्र बांधवा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होणाऱ्या ‘यशश्री’ स्पर्धा परीक्षा संकल्प अभियानाच्या बोध चिन्हांचे देखील अनावरण करण्यात आले.

या अभियानात विद्यार्थ्यांना 365 दिवस मोफत आँनलाईन टेस्ट सिरीज व तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. सर्व टेस्ट सिरीज आँनलाईन होणार असून विद्यार्थी मोबाईलवरून देखील सोडवू शकणार आहे. दिवसातून केव्हाही टेस्ट पेपर देऊन त्याचा निकाल पाहता येणार आहे. या आँनलाईन टेस्ट सिरीज सोबतच महिन्यातून एक व्यक्तीमत्व विकास, मुलाखत, मार्गदर्शन व प्रतिष्ठित मान्यवरांकडून ट्रेनिंग तसेच विविध शासकीय भरती विषयी अपडेट्स देखील मिळणार आहे. असं लहु बालवडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री सि.टी. रवी यांच्याकडून ‘यशश्री’ स्पर्धा परीक्षा संकल्प अभियानाचे कौतुक करण्यात आले. त्यांनी लहू बालवडकर सोशल वेल्फेअर यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार गिरीश बापट आणि प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, शहर संघटक सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.

तसेच लहू बालवडकर यांच्या ऑफिसमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एमपीएससी यूपीएससी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता. मागील 13 वर्षापासून लहु बालवडकर सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. 2007 पासून दहिहंडी उत्सव, नवरात्री उत्सव आणि अशा अनेक सण उत्सवाचे भव्य स्तरावर त्यांनी आयोजन केले. 2019 साली लहु बालवडकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अविरतपणे सामाजिक कार्य करीत आहेत. कोरोना काळात देखील त्यांनी 500 पेक्षा जास्त नागरिकांना दररोज मोफत जेवण, सोसायट्यांमधील नागरिकांना घरपोच मोफत भाजीपाला, बाणेर, बालेवाडी, सुस , म्हाळुंगे येथील 5 हजार पेक्षा जास्त कुटूंबांना महिनाभर पुरेल असे रेशन किट वाटप केले.

केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी अलीकडेच लहू बालवडकर सोशल वेल्फेअर संचलित फर्स्ट एड पॉलिक्लिनिक वीस रुपयात तपासणी फी दवाखान्यात भेट दिली होती. राज्यातील तथा केंद्रातील दिग्गज नेत्यांनी बालवडकरांच्या कार्याची दखल घेतली असल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. आगामी महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यातच बालवडकरांचे समाजकार्य अविरतपणे पुढे चालू राजकारणाची जोड मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी आगामी पुणे महापालिका निवडणुक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिवाय, भाजपमधील प्रविण दरेकर, भारती पवार, चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितीतील लावून त्यांच्या कार्याची दखल घेतली. त्यामुळे लहु बालवडकरांना आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून संधी मिळण्याचे मानले जात आहे . बालवडकर २०२२ मध्ये निवडून आल्यास त्यांच्या समाजकार्यांला एक नवसंजीवनी मिळणार यात तिळमात्र शंका नाही.