कितीही खालची पातळी गाठा योग्य वेळी व्याजासकट उत्तर मिळेल; मिटकरींचा भाजपला इशारा

मुंबई –  नागपुरातील वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर ईडीने धाड (ED Raid) टाकल्याची बातमी समोर आली आहे. गुरुवारी सकाळपासूनच उके यांच्या नागुपरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु आहे. मात्र ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान,  सहा तासांच्या चौकशीनंतर  ईडीने उके यांना ताब्यात घेतले आहे. उके यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari twit)  यांनी देखील या प्रकरणी भाष्य केले आहे.

ते म्हणाले, सतिश उके यांच्यावरील कारवाई मागे फक्त भाजपची सुड यंत्रणा व त्यामागील मास्टर माईंड नागपुरातीलच… कितीही खालची पातळी गाठा योग्य वेळी व्याजासकट उत्तर मिळेल. असा इशारा मिटकरी यांनी दिला आहे. दरम्यान, आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.