Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प 

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प 

Republican Party- रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर एन.डी.ए.चा आणि महाराष्ट्रात महायुतीचा अविभाज्य घटक पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडूणुकीत (Loksabha Election) महाराष्ट्रात महायुतीचे 45 खासदार निवडुन आणण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प आहे.आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा संकल्प रिपब्लिकन कार्यकर्त्यांनीकरावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केले.

चेंबुर येथील चंदन लॉन येथे रिपब्लिकन पक्षाचा दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने आयोजित संकल्प मेळाव्यात ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचार मंचावर संकल्प मेळाव्याचे सभाअध्यक्ष, आयोजक,रिपाइं चे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजय डोळसे उपस्थित होते.तसेच रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,राज्य सरचिटणीस गौतम सोनावने,मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,फुलाबाई सोनावने,अभया सोनावने,उषा रामलु,कामु पवार,स्वामी वैदु,महादेव साळवे,बाळासहेब बनसोडे,साहेबराव ससाणे,अनिस पठाण,सुभाष साळवे,रवि गायकवाड,नंदु साठे,शंकर साठे,महेंद्र पाटील,वैशाली जगताप, एम.एस.नंदा,सचिन मोहिते,रमेश गायकवाड,भाजप नेते विठ्ठल खरडमोल आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे.महाराष्ट्र आणि मुंबईत रिपाइंचा बालेकिल्ला आहे.1992 च्या महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडुन आले होते.रिपाइं ला महापौर पद ही त्यावेळी मिळाले होते.या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी  कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीमधुन 25 जागा लढवण्याची तयारी रिपब्लिकन पक्ष करित आहे.त्यातुन किमान 15 जागा तरी निवडुन आणण्याचा आणि मुंबईचे उपमहापौरपद मिळविण्यचा रिपाइंचा संकल्प  आहे. त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपआपल्या भागात कामाला लागावे.जनतेत मिसळून जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावे.असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

रिपाइंच्या या संकल्प मेळाव्यास महायुतीमधील भाजप आणि शिवसेने च्या नेत्यांना मुख्यमंत्री; उपमुख्यमंत्री; आणि स्थानिक खासदार राहुल शेवाळे; भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदींना निमंत्रित करण्यात आले होते.मात्र महायुतीमधील एकही नेता  रिपाइं च्या संकल्प मेळाव्यास उपस्थित राहिले  नसल्याची या मेळाव्यात मोठी चर्चा झाली. याबाबत रिपाइं नेत्यांनी नाराजी ही व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या : 

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड: Nana Patole

स्पेनमधून भारतात फिरायला आलेल्या विदेशी महिलेच्या तंबूत घुसून ८-१० जणांनी केलं नकोसं कृत्य

अंबानींचं लग्न पाकिस्तान लीग पेक्षा भारी? प्री-वेडिंग अटेंड करायला PSL सोडून आला दिग्गज खेळाडू

Previous Post
रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिर्डी, सोलापूर आणि संभाजीनगर मतदारसंघावर दावा 

रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिर्डी, सोलापूर आणि संभाजीनगर मतदारसंघावर दावा 

Next Post
मागासवर्गीय, अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवू: खा. Chandrakant Handore

मागासवर्गीय, अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवू: खा. Chandrakant Handore

Related Posts
फडणवीस सरकारच्या खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदावरून राजकीय रस्सीखेच

फडणवीस सरकारच्या खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदावरून राजकीय रस्सीखेच

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली…
Read More

महिला सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर! चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे – महिला सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर असून, त्यासाठी अनेक उपक्रम राबविले असल्याचे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज…
Read More
Date Girls-Les Money Tips

मुलींना कमी पैशात डेट कसे करता येईल? ‘या’ टिप्स आजमावून जरूर पहा

खरतर डेटिंग (Dating) हे कनेक्शन तयार करणे, मजा करणे आणि एकमेकांना चांगले जाणून घेणे केले जाते पण सध्या…
Read More