दिल्ली पोलिसांनी ISISच्या दहशतवाद्याला पकडले, पुण्यातून पळून जाऊन दिल्लीत होता लपला

NIA ने त्याच्या डोक्यावर ठेवले होते 3 लाखांचे बक्षीस

Crime News – दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने ISIS मॉड्यूलच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. शाहनवाज (Shahnavaz) असे या दहशतवाद्याचे नाव समोर आले असून त्याला दिल्लीतूनच अटक करण्यात आली आहे. नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने (एनआयए,NIA) या दहशतवाद्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. हा दहशतवादी एनआयएचा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी असून त्याला शाहनवाज उर्फ ​​शफी उज्जामा या नावानेही ओळखले जाते. शाहनवाज हा पुणे इसिस प्रकरणात वॉण्टेड होता.

शाहनवाज हा दिल्लीचा रहिवासी असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. तो व्यवसायाने अभियंता आहे. दहशतवादी शाहनवाज पुण्यातून पलायन करून दिल्लीत राहत होता. सध्या दहशतवाद्याची चौकशी सुरू आहे. वास्तविक, एनआयएने ISIS पुणे मॉड्यूल प्रकरणात 7 जणांना अटक केली होती. यावेळी तीन दहशतवादी पळून दिल्लीत लपले. या तीन दहशतवाद्यांपैकी एक म्हणजे शाहनवाज उर्फ ​​शफी उज्जामा.

राजधानीत इसिसचे तीन दहशतवादी लपल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस सतर्कतेत आले आणि त्यांनी तिघांचा शोध सुरू केला. सोमवारी (2 ऑक्टोबर) शाहनवाजला पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले. मात्र, पुणे इसिस प्रकरणात वॉन्टेड असलेले रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फयाज शेख हे दोन दहशतवादी अद्याप फरार आहेत. त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालात होणार चक्क लावणीचा कार्यक्रम?

बाराही महिने चालणारे व्यवसाय, दर महिन्याला तगडी कमाई करुन देऊ शकतात ‘हे’ व्यवसाय

Bed Bugs: ढेकणांना त्रासलाय? ‘हे’ घरगुती उपाय करुन एका दिवसात पळवून लावा ढेकूण