पाण्याच्या टंचाईमुळे रब्बी हंगामावर संकट; शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी पावले उचला

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सरकारला आवाहन

Jayant Patil:- सगळे सण धूमधडाक्यात साजरे करत आहात, आता शेतकऱ्यांची (Farmers) दिवाळी (Diwali) आनंदात जावी यासाठी पावले उचला असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारला केले आहे.

ऑक्टोबर संपत आला आहे आणि रब्बी हंगामाची कामे सुरू झाली आहेत. मात्र यंदा पाऊसच कमी झाल्याने रब्बी पिकांवर मोठे संकट आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने यात तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे. सरकारने वेळीच पावले उचलली नाही तर शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावेल अशी भीती व्यक्त करत असतानाच अन्नदात्याची ही आर्त हाक सरकारपर्यंत पोहोचणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

https://youtu.be/Tt-1tSruXa0?si=kwbpullEutXoNovU

महत्वाच्या बातम्या-

‘उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता’

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला क्लिन बोल्ड केल्यानंतर शोरिफुलचे हृतिक स्टाईल सेलिब्रेशन, Video Viral

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल