भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray To Join Mahayuti: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. अशातच आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेऊन तासाभराहून अधिक वेळ चर्चा केली. या भेटीनंतर राज ठाकरे लवकरच महायुतीचे भागीदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरेंना लवकरच दिल्लीला बोलावले जाऊ शकते. येथे ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना तुम्ही एनडीएसोबत जाणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. आजचा विषय वेगळा आहे. वेगळ्या कारणासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. जेव्हा निवडणुकीचा विषय येईल, तेव्हा त्यावर बोलेल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या या विधानाने ते भाजपसोबत जाण्याच्या शक्यता अधिकच वाढल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं