शमी अय्याशी करायचा, हॉटेलात तरुणींसोबत असायचा; हसीन जहांचे भारतीय क्रिकेटरवर गंभीर आरोप

नवी दिल्ली- प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद शमी (Mohammed Shami) चांगलाच अडचणीत आला आहे. त्याची पूर्व पत्नी हसीन जहांने (Hasin Jahan) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने कोर्टात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल केली आहे. शमीच्या विरोधातील फौजदारी प्रकरण गेल्या चार वर्षापासून अडकून पडलं आहे. त्यावर त्वरीत निर्णय व्हायला हवा असं हसीनने म्हटलं आहे. तसेच शमीचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सही सुरू असल्याचा दावा करून तिने खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे शमीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हसीन जहांने कोर्टात फ्रेश याचिका दाखल करून त्यात शमीवर प्रचंड आरोप केले आहेत. कोलकाताच्या सेशन्स कोर्टाने शमीच्या विरोधात कारवाई करण्यावर स्टे लावला आहे. शमी केससाठी पैसेही देत नाही. शमी माझ्याकडून हुंड्याची मागणी करत होता. शमी टीम इंडियासोबत टूरवर गेल्यावर तिथे तो एक्स्ट्रा मॅरेटियल अफेयर ठेवायचा, असं हसीनने याचिकेत म्हटलं आहे. प्रसिद्ध व्यक्तींना वेगळी ट्रीटमेंट देऊ नये, अशी विनंतीही या याचिकेत करण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या टूरवर गेलेला शमी दुसऱ्या नंबरचा वापर करून तिथे अय्याशी करायचा. तिथे तो हॉटेलात तरुणींसोबत असायचा. बीसीसीआयच्या दौऱ्यावर असताना शमी हॉटेलात महिलांसोबत अय्याशी करतो. या महिलांशी संपर्क करण्यासाठी शमी वेगळा मोबाईल नंबर यूज करतो, असा आरोप तिने केला आहे. त्याचा फोन कोलकाताच्या लाल बाजार पोलिसांनी जप्त केला होता. मात्र, तरीही शमीची अय्याशी सुरूच आहे, असा आरोप तिने केला आहे.