शपथ महादेवाची … 30 दिवसात उत्तर देवू; मोहित कंबोज यांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २९ जूनच्या रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (Resigned) दिला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोर गटाने फारकत घेतल्याने उद्धव यांचे सरकार अल्पमतात आले होते. राजकीय गोंधळात त्यांनी काल रात्री राजीनामा दिला. दरम्यान, या घडामोडी घडत असताना भाजप नेते मोहित कंबोज (BJP leader Mohit Kamboj) यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये मोहित कंबोज यांनी उद्धव सरकारला आव्हान देत  म्हटले होते की, ‘1 जून रोजी तुम्ही आज माझ्यावर कारवाई करत आहात पण मी शपथ घेतो की  30 जून माझी तारीख असेल. मी 1 जुलै होऊ देणार नाही, हे माझे आव्हान आहे.

यावर्षी मार्च महिन्यात मोहित अडचणीत आला होता. त्यावेळी त्यांच्या फ्लॅटची बीएमसीकडून तपासणी करण्यात आली होती. त्याने बेकायदा बांधकाम केले आहे का, याचा तपास करण्यात आला. त्यावेळीही मोहितने महाराष्ट्र सरकारवर चुकीची कारवाई केल्याचा आरोप केला होता. आरोप करतानाच आपल्याला गोवण्याचा कट रचला जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता. २९ मे रोजी एका लग्न समारंभातून परतत असताना ठाकरे यांच्या बंगल्याजवळ त्यांच्या कारची तोडफोड (Car wreck) केल्याची घटनाही समोर आली होती.