Murlidhar Mohol : मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांना कोणतं खातं मिळालं?

Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (०९ जून) पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत शपथबद्ध झालेल्या ७१ खासदारांची अर्थात नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. या बैठकीत नव्या मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात पुण्याचे नवनिर्वाचीत खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातून रामदास आठवले यांच्याकडे आधीच्याच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री पदाचा कार्यभार असेल. प्रतापराव जाधव यांच्याकडं आयुष मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा स्वतंत्र प्रभार तसंच आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद सोपवण्यातआलं असून, रक्षा खडसे यांच्याकडं क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!