किरीट सोमय्या वेडा माणूस, भाजपला भुताटकीनं झपाटलंय – राऊत

मुंबई – किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाणार आहेत. ठाकरे कुटुंबाच्या 19 बंगल्यांबाबत तक्रार करण्यासाठी सोमय्या कोर्लईला जाणार आहेत. या [पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना-भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. यातच खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

कोण आहे किरीट सोमय्या? (kirit somaiya) सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे. तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या. मी त्यावर बोलणार नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे.

लवकरच इथली जनता त्याची धिंड काढेल. तो पुढे लोक मागे. तो पुढे लोक मागे अशी त्याची अवस्था होईल. सोडून द्या. वेट अँड वॉच. तो कुठे जात आहे? बंगले शोधणार आणि घरे शोधणार, असा सवाल करतानाच भाजपच्या (bjp) लोकांना भुताटकीने झपाटलं आहे. त्यांनाही स्वप्नात बंगले दिसत आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला.