विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघाला गौतम गंभीरने दिला सल्ला, सांगितला ‘या’ मोठ्या समस्येवर उपाय

Indian Squad For World Cup: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI, बीसीसीआय) मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी वनडे विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघाची घोषणा केली. केएल राहुल (KL Rahul) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांचा १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. अशा स्थितीत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) इशान किशन आणि केएल राहुलच्या फलंदाजी क्रमाबद्दल बरेच काही बोलला आहे.

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली. दुखापतग्रस्त केएल राहुलला संघात स्थान दिल्याने माजी गौतम गंभीरने आश्चर्य व्यक्त केले आहे. निवड समितीला प्रश्न करत गंभीर म्हणाला की, कोणीतरी मला सांगावे की विश्वचषक जिंकण्यासाठी नाव आवश्यक आहे की फॉर्म? विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी चांगली कामगिरी करत राहिल्यास केएल राहुल त्यांची जागा घेऊ शकेल का?

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकण्यासाठी खेळत असाल तेव्हा नावाने तुम्हाला काही फरक पडत नाही. मला वाटते की केएल राहुलच्या आधी इशान किशनने खेळले पाहिजे. गेल्या काही सामन्यांमध्ये इशानने चांगला खेळ केला आहे. त्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याचवेळी केएल राहुल क्रिकेट खेळून अनेक महिने उलटले आहेत.”

महत्त्वाच्या बातम्याः

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole