नाना भानगिरे शिंदे गटात दाखल, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

पुणे – पुण्यातील शिवसेनेचे धडाकेबाज नेते नाना भानगिरे (Shiv Sena leader Nana Bhangire) हे शिंदे गटात सामील झाले आहेत.हडपसर (Hadapsar) भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ आहे. नाना भानगिरे शिंदे गटात (Shinde group) सामील झाल्याने आगामी काळात हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची ( Western Maharashtra) जबाबदारी दिली जाणार आहे.

नाना भानगिरे हे आतापर्यंत पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक (Three times corporator) म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती. दरम्यान, हडपसर भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या नाना भानगिरे यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा गट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक मुंबईत (Mumbai)  गेले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी या गटाला चर्चेचे निमंत्रण दिल्याची माहिती आहे