आघाडीत बिघाडी : नाना पटोले यांनी राष्ट्रवादीची केली थेट सोनिया गांधींकडे तक्रार

नागपूर – गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील संघर्ष चांगलाच वाढला आहे(fight between congress and ncp). यातच आता  भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने मित्र पक्ष काँग्रेसची साथ सोडून भाजपबरोबर युती केल्याने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(congress state president nana patole) यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे(congress president sonia ghandhi) राष्ट्रवादीची तक्रार केली आहे.

पटोले यांनी याबाबत बोलताना सांगितले की, राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजप(ncp and bjp alliance) सोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने मित्र पक्ष काँग्रेसची साथ सोडून भाजप बरोबर हातमिळवणी केली. गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन काँग्रेसला एकटे पाडले. त्यामुळे तेथे अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांपासून काँग्रेसला दूर रहावे लागले, याबात पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे तक्रार केल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.