‘तारक मेहता..’चे निर्माता असित मोदींच्या अडचणीत वाढ, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) निर्माता असित मोदी (Asit Modi) मोठ्या अडचणीत सापडला आहे. पोलिसांनी असित मोदी आणि ‘तारक मेहता’शी संबंधित इतर दोन लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या शोमध्ये श्रीमती सोधीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. अभिनेत्रीने असित मोदी तसेच ‘तारक मेहता’चे कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधात तक्रार केली होती आणि आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतिन बजाज यांच्याविरोधात कलम 354 आणि 509 नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

असित मोदींविरोधात अनेक कलाकारांचे खुलासे
गेल्या अनेक दिवसांपासून असित मोदी यांच्यावर लैंगिक छळ आणि शोषणाचे आरोप होत आहेत. शोच्या अनेक कलाकारांनी असित मोदींकडून सेटवरील खराब वातावरणापासून कलाकारांना पगार न देण्यापर्यंत तक्रार केली होती.