धक्कादायक! पाटण्यात आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपा नेत्याचा मृत्यू

पाटणा- बेरोजगारी आणि भ्रष्टाचार भंगाच्या मुद्द्यावरून गुरुवारी (13 जुलै) विधानसभेला घेराव घालण्यासाठी बाहेर पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जहानाबाद जिल्हा सरचिटणीस विजय कुमार सिंह (Vijay Kumar Singh) यांचा मृत्यू झाला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राधामोहन शर्मा यांनी विजय कुमार सिंह यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. याशिवाय लाठीचार्जमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

विजय कुमार सिंह हे 2013 ते 2016 पर्यंत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष होते. 2023 मध्ये त्यांना जिल्हा सरचिटणीस बनवण्यात आले होते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी जहानाबाद जिल्हा सरचिटणीस विजय कुमार सिंह यांच्या डोक्यावर लाठीमार केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने तारा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर पीएमसीएच रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या वृत्ताने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.