Supriya Sule | ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; नणंद-भावजय लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Sunetra Pawar Vs Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील फुटीनंतर पवार घराण्यात संघर्ष वाढत आहे. आजवर जेष्ठ नेते शरद पवारांवर लोकाची घरे फोडल्याचा आरोप होत होता मात्र आता पवारांना त्यांच्याच घरातून आव्हान निर्माण झाले असून आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha constituency) नणंद भावजय यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.

बारामतील लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहेत, तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी सातत्याने चर्चेत येत आहे. अजितदादा यांना महायुतीची साथ मिळाली तर बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव शक्य असल्याचे अनेकांनी अंदाज वर्तवले आहेत यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.

या सगळ्याबाबत आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी हा काही भातुकलीचा खेळ नाही म्हणत माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही असे म्हटलं आहे. राजकारण भातुकलीचा खेळ नसतो. त्यात नाती नसतात पण जबाबदारी असते. नाती प्रेमाची असतात. मी नात्यांमध्ये आणि कामात गल्लत करत नाही. माझं काम एका जागेवर आहे. माजी नाती काही आडनावांपुरती मर्यादित नाही. मी सदानंद सुळेंसोबत जेवढा वेळ घालवते त्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांसोबत असते. नाती माझ्यासाठी कायमच राहतील. पण माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे, माझी एक वैचारिक बैठक आहे. ज्याच्यामध्ये मी लहानाची मोठी झाले. माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही. माझी वैचारिक लढाई आहे. माझी लढाई भाजप आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे. त्यांच्या चुकीच्या विचारात जे काम करत असतील त्या विचाराशी माझी लढाई आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया