‘रणबीर दर पाच मिनिटांनी…’, तृप्ती डिमरीने सांगितला इंटीमेट सीन शूट करतानाचा अनुभव

Ranbir Kapoor Tripti Dimri Intimate Scene: संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमल (Animal) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांचे इंटिमेट सीन्स चर्चेचा विषय बनले आहेत. चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडत असून त्यांच्या इंटिमेट सीन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तृप्ती डिमरीसोबत इंटिमेट सीन केल्यानंतर रणबीरने हा प्रश्न विचारला होता
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तृप्तीने रणबीरसोबत इंटिमेट सीन शूट करण्याबद्दल खुलासा केला. इंटिमेट सीन शूट करताना रणबीर तिला कसे सतत विचारत होता की, ती ठीक आहेस का? तुला अस्वस्थ तर वाटत नाही ना?. तृप्तीने सांगितले की, इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान सेटवर पाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी नव्हती आणि सर्व मॉनिटर बंद होते.

‘दर पाच मिनिटांनी…’
अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘चित्रपटात रणबीरसोबत असे सीन करत असताना, मी ठीक आहे का आणि आरामदायक आहे का, असे अभिनेता मला विचारत होता. दर पाच मिनिटांनी रणबीर कपूर माझ्या तब्येतीची चौकशी करत असे. याच्या काही दिवसांपूर्वी तृप्तीने ऍनिमलमधील त्या सीनबद्दलही सांगितले होते ज्यात रणबीर कपूरचे पात्र विजय सिंगने तिला चपला चाटायला सांगितले होते आणि तिचे त्याच्यावर खरे प्रेम आहे हे सिद्ध करायला सांगितले होते.

याबद्दल बोलताना तृप्ती म्हणाली, ‘या डायलॉगने मला माझ्या अभिनय प्रशिक्षकाने सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली, एखाद्या अभिनेत्याने चांगली, वाईट आणि कुरूप अशी सर्व प्रकारची पात्रे साकारायला तयार असले पाहिजे, परंतु जर तुम्ही तुमच्या विचारांना न्याय दिला तर तुम्हाला ते जमणार नाही. म्हणून मी ही गोष्ट मनात ठेवली.’

महत्वाच्या बातम्या-

हे ट्रिपल इंजिन सरकार नसून ट्रबल इंजिन सरकार; जयंत पाटील विधानसभेत गरजले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा;अशोक चव्हाण यांची मागणी

धीरज साहू यांच्याकडे इतका अमाप काळा पैसा असेल तर दुकानाच्या मालकाकडे किती काळा पैसा असेल ?