Mukhtar Ansari Died | तुरुंगात असलेल्या कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Mukhtar Ansari Died | कुख्यात गँगस्टर आणि माजी आमदार मुख्तार अन्सारी यांचे निधन झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर बांदा मेडिकल कॉलेज परिसराभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. मुख्तार अन्सारी यांना बेशुद्धावस्थेत आणण्यात आल्याचे रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिथे त्यांच्यावर 9 डॉक्टरांच्या पथकाने वैद्यकीय उपचार केले मात्र उपचारादरम्यान मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari Died) यांचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीची बैठक बोलावली आहे
मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर सीएम योगी आदित्यनाथ यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, राज्यात कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्याच्या अनेक भागात प्रशासन सतर्क झाले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल