Narendra Modi | मोदींच्या प्रचार सभेतील भाषण पंतप्रधान पदाला न शोभणारे; महेश तपासे यांची संतप्त प्रतिक्रिया

Narendra Modi -: राजस्थान येथे पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या प्रचार सभेतील भाषणावर देश पातळीवर टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला निवडणुकीसाठी हिंदू मुसलमान या मुद्द्याचा वापर करावा लागतो याच्यापेक्षा दुर्दैवी बाब असू शकत नाही अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.

महागाई, बेरोजगारी, शेतकरी समस्या व इतर प्रश्नांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले प्रधानमंत्री मोदी  स्वतःच्या सरकारचं अपयश झाकण्यासाठी तसेच पराभव दिसत असल्यामुळे हताश झालेल्या मानसिकतेतून अशी वक्तव्य करत आहेत असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

आज पर्यंत भारतामध्ये अनेक निवडणुका झाल्या परंतु कोणत्याही पंतप्रधानाने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान असे वक्तव्य केले नाही.मोदीजी हा देश सर्वांचा आहे आणि या देशातील नागरिक स्वतःच्या मेहनतीने स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात, त्याच्यामुळे आपण केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचे असून एका पंतप्रधानाला न शोभणारे आहे असेही तपासे पुढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर