Dharashiv LokSabha | एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

Dharashiv LokSabha | एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा आहे. अनेक ‘शस्त्रक्रिया’ नाही तर अनेकदा ‘उपचार’ झाले आहेत. एकतर त्याला काही कळत नसेल किंवा पुन्हा खोटं बोलत असेल, अशा शब्दात भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर (Omraj Nimbalkar) यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

भाजपच्या काळात 2012मध्ये 24 लोकांवर 25 शस्त्रक्रिया झाल्या तर 2016मध्ये 16 लोकांवर 138 शस्त्रक्रिया झाल्या. तसेच 2014मध्ये 9 रुग्णांवर 80 शस्त्रक्रिया झाल्याचा आरोप धाराशिव लोकसभा (Dharashiv LokSabha) मतदारसंघातील माहाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केला होता. त्याला आज राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, आपण शस्त्रक्रिया असा शब्द वापरत नाही तर उपचार असा शब्द वापरतो. समजा मी किडनीचा पेशंट आहे तर मला आठवड्याला डायलिसिस करावं लागतं. जर माझ्यावर दहा वेळा डायलसीस झाले तर माझ्यावर दहावेळा शस्त्रक्रिया झाली असं म्हणायचं का? ओमराजे यांना यातलं काही कळत नाही, किंवा खोटं बोलतोय, अशी टीका राणा जगजितसिंह पाटील यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन